राणीसावरगाव : YCMOU च्या परीक्षेत कॉप्याचा सुळसुळाट: गार्डींग नावालाच

राणीसावरगाव/विनायक आंधळे : गंगाखेड (Gangakhed) तालुक्यातील (Ranisawargaon) येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik) अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाविद्यालय (Punyashlok Ahilyabai Holkar College) राणीसावरगाव येथे दिनांक 29 मे ते 15 जून या काळात BA 1Year, BA 2 Year, BA 3 Year तसेच MA 1 Year व MA 2 Year या विषयाच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा केंद्रावर केंद्र क्रमांक 8771A वर एकूण 705 परीक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षा देत आहेत. या परीक्षा म्हणजे निव्वळ कोप्याच्या सुळसुळाट चालू आहे. गार्डीग वरचे प्रवेक्षक विद्यार्थी गाईड अपेक्षित नोट्स पाहुन उत्तर पत्रिका लिहीत आहेत. या ठिकाणी एकाच इंडो हॉलमध्ये अंदाजे 250 च्या वर परीक्षार्थी परीक्षा देत आहेत.

या परीक्षा मध्ये कॉप्या करून डिग्री घेतल्यानंतर विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत. जे विद्यार्थी रेगुलर अभ्यास करून परीक्षा देतात तिच्यावर मात्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी कॉप्या करून परीक्षा देतानी दिसतात. यामुळे रेगुलर विद्यार्थ्यावर अन्याय होतोय अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, मुक्त विद्यापीठात कॉप्या करता येतात म्हणून भरमसाठ विद्यार्थी वरील ठिकाणी ऍडमिशन घेतात असं दिसून आले आहे. मुक्त विद्यापीठ नावालाच उरले आहे का असा प्रश्न पडत आहे. यामध्ये 20 टक्के विद्यार्थी परीक्षेलाच आले नाहीत असा अल्बेल कारभार सुरू आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठाचे नाव बदनाम झाले आहे. हा प्रकार पाहून येथील महाविद्यालयाने चालणाऱ्या कॉपीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून आले आहे. ज्यावेळी परीक्षा दालनातील छायाचित्रात सरस कॉपी करताना विद्यार्थी दिसत होती त्यांना रोखण्याचे काम गार्डीग वर असणारे प्रवेशक करत नव्हते. याचा अर्थ केंद्रप्रमुख व गार्डीग वर असणारे प्रवेशक यांच्या संगनमताने हे सर्व चालू होते अस दिसुत आले. या चालणाऱ्या कॉफीवर वरिष्ठ पातळीवरून पावबंद करण्यात यावा अन्यथा कॉपी करून पास होणारे विद्यार्थी म्हणजे पालथ्या घागरी वर पाणीच.