अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का? दादा भुसेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Nashik Mahayuti Melava :  नाशिकच्या महायुतीच्या मेळाव्याला नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी खासदार संजय राऊत यांची चांगलीच धुलाई केली आहे.काही लोक रोज सकाळी 8-9 ला उठले की, टिव्हीसमोर येणार वाकडी मान करणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार, अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का? कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का तुम्ही? अशा शब्दात कृषीमंत्री तथा  दादा भूसे यांनी संजय राऊत यांच्यावर (Dada Bhuse on Sanjay Raut)टीका केली आहे.

नाशिकमध्ये आज (14 जानेवारी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात बोलताना दादा भूसे यांनी संजय राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, टिव्हीवर फक्त चमकोगिरी करणार, आता याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. असे म्हणत भुसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दादा भूसे म्हणाले की, मोदी साहेबांसमोर कोणी आहे का? दुसरं कोणी दिसत पण नाही. मोदींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मी स्वतः उमेदवार असे समजून काम करा. युवा महोत्सवात मोदीजी येऊन, सर्वांनी जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या त्याबद्दल आभार मानतो.  असं भुसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार