अखेर रश्मी ठाकरे उतरणार राजकीय आखाड्यात, नाशिकमधून…

मुंबई : आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या खांदंयाला खांदा लावून रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मैदानात उतरणार आहेत. रश्मी ठाकरे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राजकीय दौरै करणार आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे करणार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत. रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. याआधी त्यांनी वरळी तसंच शिवडीमधील कार्यक्रमांना रश्मी ठाकरे हजर होत्या. रश्मी ठाकरे या अनेक राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र त्यांनी आजपर्यंत कधीच राजकीय विषयांवर टिप्पणी केली नाही. रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे.