“मलाही मुख्यमंत्री…”, अजितदादांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

सोलापूर- नुकत्याच एका मुलाखतीत विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून राजकीय नेत्यांच्या त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, असे विचारले असता रवींद्र धंगेकर हसत म्हणाले, “मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे.” रवींद्र धंगेकर यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी करमाळ्यातील काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजीवरही भाष्य केले. स्थानिक नेत्यांमधील वाद चर्चेतून मिटविला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एबीपी न्यूज हिंदीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.