Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar | महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्र्यपणे त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितने ७ जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी आपण मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवी आघाडी स्थापन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र आता मनोज जरांगे यांनी आंबेडकरांचा प्रस्ताव फेटाळल्याचे उघड केले आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांच्यासोबत चर्चा झाली, पण मी अजून वंचित बहुजन आघाडीला पाठींबा जाहीर केलेला नाही. ३० मार्चपर्यंत आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार”, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार