Uddhav Thackeray | “भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

Uddhav Thackeray | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये उपस्थिती दर्शवत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबर आहे ती नकली शिवसेना आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसंच नकली शिवसेनेचे लोक महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांना आणून रॅली काढताना दिसत आहेत असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरादर प्रत्युत्तर दिलं आहे.

सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता. जे भाषण झाले ते देशाच्या पंतप्रधानांचे नव्हते. शिवसेना प्रमुख ज्यांना कमळाबाई म्हणायचे त्या पक्षाला मी भेकड, भाकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी बोलले. निवडणूक प्रचार पंतप्रधान एका पक्षाचा करत असतील तो घटनेवर हात ठेवून घेतलेल्या शपथेचा भंग होतो. त्यामुळेच मला वाटते की, नरेंद्र मोदींचे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचे होते. कारण ते अध्यक्षही नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पलटावर केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला