जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग अखेर मोकळा

Jayakwadi Dam:  अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे, त्यामुळे आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जायकवाडीसाठी साडे आठ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून या निर्णयाच्या विरोधात, आधी मुंबई उच्च न्यायालयात, आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, या याचिकेवर काल सुनावणी झाली.

याप्रकरणी पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचं पाणी विनाविलंब सोडावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  (Ashok Chavan)यांनी समाज माध्यमाद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा