Asia Cup: भारत हरला, माझ्यासह पाकिस्तान संघाला हायसं वाटलं! शोएब अख्तरने उडवली खिल्ली

Shoaib Akhtar: आशिया चषक 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले. सुपर ४ च्या अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादनेशने भारताला ६ धावांनी पराभूत केले. भारताच्या या पराभवाने सर्वात जास्त आनंद पाकिस्तानला झाला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याचं विधान चर्चेत आले आहे. भारताच्या पराभवानं माझ्यासह पाकिस्तानला हायसं वाटलं असं, शोएब म्हणाला.

“भारतीय संघ हरला. लाजिरवाणा पराभव. आम्ही जास्त टीका करू शकत नाही. बांगलादेशही या स्पर्धेत खेळायला आला आहे. लोक पाकिस्तानवर टीका करत होते, की त्यांचा पराभव झाला. श्रीलंका हा चांगला संघ आहे, सरासरी संघ नाही. बांगलादेशच्या बाबतीतही असेच आहे. ते सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. शेवटी, माझ्यासह पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी काहीसा दिलासा आहे की भारत हरला,” असे अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.

रावळपिंडी एक्सप्रेसने म्हटले की बांगलादेश हा “सरासरी” संघ नाही आणि आशिया चषक विजेतेपदासाठी अंतिम फेरीत श्रीलंकेचा सामना करणार्‍या भारतासाठी हा वेक अप कॉल आहे. “फायनलपूर्वी भारतासाठी हा वेक अप कॉल आहे. काही सामने जिंकल्यानंतर तुम्ही संघांना हलक्यात घेऊ शकत नाही,” असे अख्तर पुढे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-