‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ पुस्तकाचे होणार Mohan Bhgwat यांच्या हस्ते प्रकाशन

Mohan Bhagwat – ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या अभिजीत जोग यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. सिम्बायोसिस विश्व भवन सभागृह येथे रविवारी (१७ सप्टेंबर) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डाव्या विचारसरणीने केवळ आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला कशा पद्धतीने पोखरले आहे, कसा उपद्रव केला आहे याचे साधार आणि अभ्यासपूर्ण विवेचन  जोग यांनी या पुस्तकात केले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमात दोन्ही वक्त्यांकडून या विषयातील अधिक माहिती ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘दिलीपराज प्रकाशन’चे मधुर बर्वे आणि मोहित बर्वे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !