माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडे वापरू नका, अन्यथा…; नाना पाटेकरांच्या वक्तव्याची चर्चा

Actor Nana Patekar: जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी सर्वांचे मनोरंजन केले आहे. विवेक अग्निहोत्रीच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) या चित्रपटात आता ते दिसणार आहेत आणि सध्या ते या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यावेळी ते अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने बोलले. नुकतेच त्यांनी असेही सांगितले की, एकदा त्यांनी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साली यांना फोन करून फटकारले होते. तसेच त्यांनी आपल्या मृत्यूबद्दलही वक्तव्य केले आहे.

नाना पाटेकर म्हणाले की, ते साधे जीवन जगतात. या पदावर पोहोचल्यानंतरही तो आपल्या मुळाशी जोडलेला आहे. यासोबतच त्यांनी मृत्यूबद्दलही लक्षवेधी वक्तव्य केले आहे. मृत्यूनंतर नाना पाटेकर यांना १२ मण लाकडे लागतील. मी माझ्यासाठी १२ मण लाकडे तयार ठेवली आहेत. सर्व लाकडे सुकी आहेत. माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडे वापरू नका, नाहीतर सर्वत्र धूर होईल. जे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असतील, त्यांच्या डोळ्यांत पाणी येईल आणि ते माझ्यासाठी रडतात, असा अनेकांचा गैरसमज होईल. असे उद्गगार नाना पाटेकर यांनी स्वतःला उद्देशून काढले आहेत. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले की, त्यांचा आगामी चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. जे तथ्य आणि आकडेवारीवर आधारित आहे. ते म्हणाले, ‘ही सत्यकथा आहे, वास्तविक घटनांवर आधारित आहे, असे तुम्ही म्हणता, तेव्हा आम्ही निर्मात्यांना विचारू शकतो कारण ते वस्तुस्थितीशी खेळू शकत नाहीत. जर ही सत्यकथा असेल तर त्यातील सर्व काही खरे असले पाहिजे.”

संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटाचा संदर्भ देत ते म्हणाले, “तुम्ही भन्सालींच्या चित्रपटांमध्ये हे पाहू शकता, मी ‘मल्हारी’ गाण्यावर नाराज होतो. मी त्यांना थेट फोन केला आणि म्हणालो हे ‘वाट लवली’ काय आहे? मला ते आवडले नाही म्हणून मी त्यांना हे सांगितले. लोकांना काय आवडते किंवा काय आवडत नाही याची मला पर्वा नाही. मला ते आवडले नाही तर मी त्यांना सांगितले.” नाना पाटेकर यांनी 27 वर्षांपूर्वी 1996 मध्ये रिलीज झालेल्या ‘खामोशी: द म्युझिकल’ या दिग्दर्शनातील डेब्यू चित्रपटात भन्सालींसोबत काम केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

https://www.youtube.com/watch?v=h4yDr9dyH28&t=4s