Asia Cup: अरे अरे… लाजिरवाण्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये आझम आणि आफ्रिदीचे भांडण?

Babar Azam Shaheen Afridi Heated Argument: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, टीमच्या लाजिरवाण्या पराभवानंतर दोन स्टार खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भिडले. सामना संपल्यानंतर या दोन खेळाडूंमध्ये ड्रेसिंग रूममध्ये वादावादी झाली, त्यांना शांत करण्यासाठी एका वरिष्ठ खेळाडूला मध्यस्थी करावी लागली. ही घटना श्रीलंका आणि पाकिस्तान (sri lanka vs pakistan) यांच्यातील सुपर-4 सामन्यानंतरची सांगितली जात आहे.

आशिया चषकाच्या या सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध डीएलएस पद्धती अंतर्गत 2 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानचा संघही या स्पर्धेतून बाहेर पडला. वृत्तानुसार, सामना संपल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार वादावादी झाली, त्यामुळे सहकारी खेळाडू मोहम्मद रिझवानला हस्तक्षेप करावा लागला.

बाबर आझम-शाहीन आफ्रिदी एकमेकांशी भिडले

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बोलावले होते. या पराभवाने बाबर आझम खूपच निराश झाला होता. बाबर आझमने ड्रेसिंग रुममधील खेळाडूंना सांगितले की, तुम्ही जबाबदारीने खेळत नाही. त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीने त्याला रोखले आणि सांगितले की, ज्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली त्यांचे तरी कौतुक केले पाहिजे. बाबरला शाहीनची ही गोष्ट अजिबात आवडली नाही.पाकिस्तानी कर्णधाराने सांगितले की, मला माहित आहे की कोणाची कामगिरी चांगली होती आणि कोणाची नव्हती. बाबर आझम पुढे म्हणाला की, काही खेळाडू स्वत:ला सुपरस्टार समजतात. अशाप्रकारे दोघांमधील संभाषण इतके वाढले की मोहम्मद रिजवानला हस्तक्षेप करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-