‘वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढा’, पडळकरांचं शिंदेंना पत्र

Gopichand Padalkar Letter To Eknath Shinde: वाफगावचा किल्ला (Wafgaon Fort) रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Santha) ताब्यातून काढा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde)  केली आहे. वाफगावचा किल्ला महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात द्या या आशयाचे पत्र गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिले आहे. होळकर शाहीच्या इतिहासाचं संवर्धन आणि जतन करण्याची मागणी पडळकरांनी केली आहे.

महायुती सरकारने किल्ले वाफगाव संवर्धनासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. मंजूर निधी रयतच्या पथ्यावर जाण्याची भीती आहे. रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर किल्ले वाफगावचा विकास व्हावा. शेकडो कोटींच्या निधीसहित स्वतंत्र प्राधिकरण हवे. असं पडळकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत