सोनी सबचे कलाकार काय म्हणत आहेत दिवाळीविषयी..

Diwali 2023: दिवाळी हा सण म्हणजे काळोखावरील प्रकाशाच्या, वाईटावरील चांगल्याच्या आणि अज्ञानावरील ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी समस्त देशातील लोक आपले घर दिवे आणि पणत्यांनी सुशोभित करतात. घरापुढे सुंदर रांगोळी रेखतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात. सोनी सबवरील (Sony Sub) लोकप्रिय कलाकार सांगत आहेत ते दिवाळी कशी साजरी करतात, त्यांचा सेटवरचा अनुभव कसा आहे आणि इतरही बरेच काही.

सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनची भूमिका करत असलेली अंजली तत्रारी म्हणते, “वर्षभर मी दिवाळीची वाट बघत असते, कारण माझी ही फारच आवडती परंपरा आहे. दिवाळीशी निगडीत जुन्या परंपरा मी मनापासून पाळते. घराची साफसफाई करण्यापासून ते चविष्ट फराळावर ताव मारण्यापर्यंत सगळेच मी मनापासून करते. दिव्यांच्या माळांनी मी घराची रोषणाई करते. या दिवाळीत मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहे, ती गोष्ट म्हणजे रांगोळी काढणे आणि माझ्या मित्र-मैत्रिणी आणि वंशजच्या सह-कलाकारांसोबत कार्ड पार्टीची!”

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी करुणा पांडे म्हणते, “मला पहिल्यापासूनच दिवाळी हा सण फार आवडतो. दिव्यांविषयी मला विशेष आकर्षण आहे. लहानपणी हा सण खाण्यापिण्याची चंगळ म्हणून आवडायचा. माझी आई दिवाळीसाठी फराळ करायची त्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. आज देखील मिठाईसमोर माझी संपूर्ण शरणागती असते. दिवाळीच्या गोड आठवणींचा स्वाद त्यात असतो. पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका करताना लहानपणी माझ्या संपूर्ण कुटुंबासह साजरी केलेली दिवाळी मला आठवते. त्या आठवणी मला आयुष्यात चांगली कामगिरी करण्याचे बळ देतात.”

सोनी सबवरील वंशज मालिकेत भानुप्रताप महाजन ही व्यक्तिरेखा साकारणारा पुनीत इस्सार म्हणतो, “दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, ज्याची मी आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी आपले घर आणि जीवन प्रकाशमय करते. लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी अजून मला खुणावतात. आपल्या देशात दिवाळी हा फार मोठा आनंद पसरवणारा सण आहे. वंशज मालिकेत माझी भूमिका एका मोठ्या व्यवसाय साम्राज्याच्या राखणकर्त्याची आणि या सम्राज्यासाठी पात्र वारस शोधणाऱ्याची आहे. त्याचप्रमाणे दिवाळी हा सण देखील माझ्यात आशा, प्रकाश आणि जबाबदारीची जाणीव जागवतो.”

सोनी सबवरील ‘पश्मीना’ मालिकेत प्रीतीची भूमिका करणारी गौरी प्रधान म्हणते, “मी जम्मूची आहे, पण मला काश्मीरमध्ये दिवाळी साजरी करण्याची संधी कधीच मिळाली नाही, विशेषतः माझा पती हितेन याच्यासोबत. यावर्षीची दिवाळी लक्षणीय आहे, कारण यावर्षी ‘पश्मीना – धागे मोहब्बत के’ या माझ्या नवीन मालिकेच्या टीमसोबत हा सण साजरा करण्याची संधी मला मिळाली आहे. हितेन आणि मी असे ठरवले आहे की आमच्या मुलांना देखील इथेच बोलावून घ्यायचे. अशा रीतीने मी माझे कुटुंब आणि पश्मीनाची संपूर्ण टीम यांच्यासह दिवाळी साजरी करू शकेन.”

सोनी सबवरील पश्मीना मालिकेत राघवची भूमिका करणारा निशांत मलकानी म्हणतो, “काश्मीरच्या धुंद-मनोहर परिसरात दिवाळीचा सण साजरा करणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या जन्म दुबईचा आहे. दिवाळीच्या माझ्या आठवणी कोलकाता येथे काली पूजेच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. पण यावर्षी नियतीच्या मनात काही वेगळेच होते, म्हणूनच तर यावर्षी मी इथे, काश्मीरमध्ये आहे. या शूटिंगच्या निमित्ताने याच ठिकाणी आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत, परंपरा आणि संस्कृतीचा संयोग बघणार आहोत आणि पश्मीनाच्या टीमसोबत मजा करणार आहोत. सगळा पारंपरिक सोहळा चालू आहे आणि मी त्याचा मनमुराद आनंद उपभोगत आहे.”

सोनी सबवरील वंशज मालिकेत दिग्विजयची भूमिका करणारा माहिर पांधी म्हणतो, “ज्याप्रमाणे दिवाळी अंधार आणि प्रकाश यांच्यातील नाते दाखवते, आपल्या स्वभावात विविध विरोधाभासी वृत्तींचा गोफ विणलेला असतो. मी फिटनेस सांभाळणारा आहे, पण दिवाळी ही अशी वेळ असते, जेव्हा मी स्वतःला मुक्त सोडतो आणि फराळाचा यथेच्छ आस्वाद घेतो. मी दिवाळीची आणि स्वादिष्ट फराळाची आतुरतेने वाट बघत आहे.”

बघत रहा, ‘वंशज’, ‘पुष्पा इम्पॉसिबल’ आणि ‘पश्मीना – धागे मोहब्बत के’ फक्त सोनी सबवर!

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण