हिमालयात जाईन, पण राजकारणात जाणार नाही – मनोज जरांगे पाटील 

Manoj Jarange Patil – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून मनोज जरांगे यांच्यावर सध्या सर्वांचेच लक्ष आहे. त्यांच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा होत असते यातच आता त्यांनी आणखी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. मी राजकारणात जाणार नाही…मराठा समाजाने राजकारणात जाण्यास सांगितलं तर मी हिमालयातच जाईल, असे  मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

प्रामाणिक आहे. जे पोटात आहे ते ओठात आहे. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं स्वप्न काय आहे ते सांगितलं. जरांगे म्हणाले, ‘काहीही होऊ दे, समाजाच्या हितासाठी थेट आंदोलन करायचं. गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला त्यांच्या पदरात आरक्षण टाकायचं आहे. असं ते म्हणाले.
२० तारखेपासून जीवाची पर्वा न करता रातपाठ एक करायची’,तर मी गोरगरीब मराठा समाजासाठी लढलो माझा समाज माझ्यावर कसलाच अविश्वास करीत नाही. मी 20 जानेवारी तारीख सांगितली समाजाने लगेच मान्य केलं, समाज आता तयारीला लागला आहे. समाजाबद्दल मला एक टक्काही शंका नाही पण राजकारण नकोच, जण आंदोलनातून मी समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो, सत्तेत नसताना मी 54 लाख लोकांना न्याय देऊस शकलो, मग सत्तेत जाण्याची गरज नाही, असं स्पष्ट जरांगे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत