Republican Party | रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातर्फ़े आज चेंबूरमध्ये संकल्प मेळावा

मुंबई – रिपब्लिकन पक्षाच्या (Republican Party) दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने उद्या शुक्रवार दि.1 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता चेंबूर मध्ये चंदन लॉन; देवनार डेपो जवळ; छत्रपती शिवाजी महाराज चौक; सायन ट्रॉमबे रोड; पांजरापोळ; चेंबूर येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या संकल्प मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वतः रामदास आठवले,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री मंगलप्रभात लोढा,खासदार राहुल शेवाळे,भाजप चे अध्यक्ष आ.आशिष शेलार, रिपाइंचे माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि रिपाइं चे तसेच महायुती चे अनेक अन्यवर नेते उपस्थित राहणार आहे रिपाइं च्या या संकल्प मेळाव्याचे अध्यक्ष रिपाइं चे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे (Sanjay Dolse) आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर मुंबईत रिपब्लिकन पक्षाच्या (Republican Party) वतीने आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यात चेंबूर मध्ये आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या या जिल्हा संकल्प मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने हा मेळावा महायुतीच्या दृष्टीने महत्वाचा मेळावा ठरला आहे. केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महायुतीची अभेद्य एकजूटीचे शक्तीप्रदर्शन रिपाइं च्या संकल्प मेळाव्यात होणार असल्याची माहिती या मेळाव्याचे मूख्य संयोजक आणि सभाध्यक्ष रिपाइं चे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल