Pune News | पुण्यात पब आणि हॉटेल रात्री दीडपर्यंत सुरु राहणार

Pune News – पुण्यात पब आणि हॉटेल रात्री दीडपर्यंत सुरु राहणार पुणेकरांना आता पब आणिहॉटेलिंग रात्री दीड वाजेपर्यंत एन्जॉय करता येणार आहे… कारण पुणे पोलिसांनीच तशी परवानगी दिलीय मात्र, तरीही या निर्णयामुळे एरवी सुसंस्कृत म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या शांततेला गालबोट तर लागणार नाही ना? तसेच, सरकारच्या तिजोरीत महसुलाची भर टाकताना पुण्याच्या (Pune News) कायदा सुव्यवस्थेत काही तूट राहणार नाही ना? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.

पुणे पोलिसांनी शहरातील पब आणि बार चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आली आहे. ही कारवाई सौम्य करावी अशी विनंती पब आणि बार चालकांच्या संघटनेने केली. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रात्री दहानंतर हॉटेल बंद करण्याच्या सूचना देतात त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे; त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल एक बैठक घेतली. मध्यरात्री दीडपर्यंत पब आणि मद्यालय सुरू ठेवण्याची मुभा त्यांनी दिली आहे. मात्र, त्यानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि मद्यालयांविरुद्ध कारवाई करावी, करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल