Ramdas Athawale – संविधान धोक्यात नाही काँग्रेस आणि इंडी आघाडी धोक्यात

Ramdas Athawale – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधनामुळे भारतीय लोकशाही (Democracy) मजबूत आहे. संविधानाला कुणाचाही धोका नाही. संविधान धोक्यात असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधी पक्षाची आघाडीच धोक्यात आहे. संविधान धोक्यात नाही उलट काँग्रेस आणि इंडी आघाडीच धोक्यात आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे समता; बंधुता; राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय देणारे आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही. संविधान बदलण्याचा खोटा प्रचार करून समाजात फूट पाडणे चूकीचे आहे. संविधान कुणाच्याही बापाला बदलता येणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तर संविधान समर्थक आहेत.त्यांनी नवीन संसद भवन ला संविधान भवन नाव दिले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना विरोधकांनी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ते बदनाम होणार नाहीत. त्यांनी सर्वांसाठी चांगले काम केले आहे.त्यामुळे जगात नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहेत. रिपब्लिकन पक्ष नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. ईशान्य भारतातील आसाम सोबत मेघालय; अरुणाचल प्रदेश; मणिपूर; नागालँड; त्रिपुरा आणि मिझोराम मध्ये रिपब्लिकन पक्ष प्रबळ होत आहे. देशभर रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. देशभर रिपब्लिकन पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना साथ देणार आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल