रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिर्डी, सोलापूर आणि संभाजीनगर मतदारसंघावर दावा 

Republican Party- नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर दोन आमदार निवडून आले आहे. आसाम; नागालँड आणि मणिपूर मध्ये रिपब्लिकन पक्षाचे  खासदार निवडून येतील अशी ताकद वाढली आहे. महाराष्ट्र तर रिपाइं चा बालेकिल्ला आहे. राज्यात रिपाइंला शिर्डी सोलापूर या जागा मिळाल्याच पाहिजेत.  त्यात आता संभाजीनगरची लोकसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला किमान दोन जागा लोकसभा निवडणुकीत राज्यात सोडल्या पाहिजेत असा रिपाइंचा प्रस्ताव असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी दिली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही व्यापक आहे. देशातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाला न्याय देणारे संविधान त्यांनी देशाला दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारतीय संविधान मजबूत करणारे नेते आहेत.संविधान मजबूत म्हणजे देश मजबुत. संविधानामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे असे रामदास आठवले म्हणाले.

रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एन.डी.ए.चा आणि महाराष्ट्रात महायुतीचा अविभाज्य घटक पक्ष आहे.आगामी लोकसभा निवडूणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार निवडुन आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प आहे.आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

चेंबुर येथील चंदन लॉन येथे रिपब्लिकन पक्षाचा दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आयोजित संकल्प मेळाव्यात ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचार मंचावर संकल्प मेळाव्याचे सभाअध्यक्ष, आयोजक,रिपाइं चे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे उपस्थित होते.तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनावने,मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,फुलाबाई सोनावने,अभया सोनावने,उषा रामलु,कामु पवार,स्वामी वैदु,महादेव साळवे,बाळासहेब बनसोडे,साहेबराव ससाणे,अनिस पठाण,सुभाष साळवे,रवि गायकवाड,नंदु साठे,शंकर साठे,महेंद्र पाटील,वैशाली जगताप, एम.एस.नंदा,सचिन मोहिते,रमेश गायकवाड,भाजप नेते विठ्ठल खरडमोल आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे.महाराष्ट्र आणि मुंबईत रिपाइंचा बालेकिल्ला आहे.1992 च्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते.रिपाइं ला महापौर पद ही त्यावेळी मिळाले होते.या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी  कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीमधुन 25 जागा लढवण्याची तयारी रिपब्लिकन पक्ष करित आहे.त्यातुन किमान 15 जागा तरी निवडुन आणण्याचा आणि मुंबईचे उपमहापौरपद मिळविण्यचा रिपाइंचा संकल्प  आहे. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागात कामाला लागावे.जनतेत मिसळून जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे.असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

रिपाइंच्या या संकल्प मेळाव्यास महायुतीमधील भाजप आणि शिवसेने च्या नेत्यांना मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री; आणि स्थानिक खासदार राहुल शेवाळे; भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींना निमंत्रित करण्यात आले होते.मात्र महायुतीमधील एकही नेता  रिपाइंच्या संकल्प मेळाव्यास उपस्थित राहिले  नसल्याची या मेळाव्यात मोठी चर्चा झाली. याबाबत रिपाइं नेत्यांनी नाराजी ही व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या : 

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: Nana Patole

स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य

अंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी? प्री-वेडिंग अटेंड करायला PSL सोडून आला दिग्गज खेळाडू