“तू गे आहेस ना?”, विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरने दिले थेट उत्तर; म्हणाला…

रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की कहानी’ चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच ‘रॉकी और रानी की कहानी’ सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) थ्रेड्स ॲपवर नवे अकाऊंट ओपन केले. यावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्याने १० मिनिटांसाठी ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतले. यावेळी करणला त्याच्या चाहत्यांनी वैयक्तिक आयुष्य तसेच त्याच्या आगामी चित्रपटांविषयी काही प्रश्न विचारले. यादरम्यान एका युजरने करणला गे असल्याचा प्रश्न विचारला, ज्यावर त्याने दिलेले उत्तर चर्चेत आहे.

थ्रेड्सवर करण जोहरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. एका युजरने त्याला विचारले, “तू गे आहेस ना?” यावर करणने “तुला माझ्यात काही रस का?” असे मजेशीर आणि थेट उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.