क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असणारा ऋषभ पंत पुनरागमन करणार

Rishabh Pant In IPL 2024: ऋषभ पंत IPL 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. तो पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळताना दिसणार आहे. खुद्द दिल्ली कॅपिटल्सनेच हे सांगितले आहे. जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर असलेला ऋषभ पंत आयपीएलच्या पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी निश्चितपणे सांभाळेल, असे डीसी व्यवस्थापनाने म्हटले आहे.

दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाने म्हटले आहे की, ऋषभ पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस तो पूर्ण तंदुरुस्ती प्राप्त करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, त्याचा आयपीएलमधील सहभाग NCA व्यवस्थापकांच्या संमतीवरच अवलंबून असेल.ऋषभ पंत गेल्या वर्षीच्या अखेरीस एका भीषण कार अपघातात बळी पडला होता. यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तेव्हापासून आजपर्यंत तो क्रिकेटच्या मैदानापासून अंतर राखत आहे.

ऋषभ पंतच्या यष्टिरक्षणाबाबत फ्रँचायझीने म्हटले आहे की, बीसीसीआयने हिरवा सिग्नल दिला तरच ऋषभ आयपीएलमध्ये विकेटकीपिंग करेल. अन्यथा तो फक्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करेल. फ्रँचायझीने असेही म्हटले आहे की, जरी तो यष्टिरक्षण करणार नसला तरी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करत तो मैदानावर नक्कीच राहील.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki