‘तू होती का माझी परी..’, बीडच्या शेतकरी पुत्राने गौतमी पाटीलला घातली लग्नाची मागणी

गौतमी पाटील (Gautami Patil) हा सध्या चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या मनाला भुरळ घातलेल्या गौतमीला लग्न करायचे आहे. ती २५ वर्षांची असून तिला तिच्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवाय, जो तिला कोणत्याही परिस्थितीत साथ देईल. आता याच गौतमीला बीडच्या एका शेतकरी पुत्राने लग्नाची मागणी घातली आहे.

रोहन गलांडे पाटील (rohan patil) (वय 26) याने गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, की गौतमी पाटील तू होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुणी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर मला भेटायला ये. मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

इतकेच नाही तर या तरुणाने आपल्या पत्रात घराचा पत्ता देखील लिहिला आहे. दरम्यान वराच्या शोधत असणारी गौतमी पाटील, बीडच्या या रोहन गलांडे पाटलाच्या पत्राला काय उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.