नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळं तारुण्यातच युवांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या…; रोहित पवारांनी मांडली व्यथा 

 Vijaykumar Gavit – महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमधील मंत्री विजय कुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी अजब विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते विजय कुमार गावित यांनी म्हटले आहे की, अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्हीही मासे खाऊन डोळे सुंदर करा. म्हणजे जिला पटवायचे तिला पटवता येईल, असं वादग्रस्त आणि धक्कादायक विधान विजय कुमार गावित यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित धुळ्यात मच्छिमारांना मासेमारी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला आले होते. या ठिकाणी त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी डॉ.सुप्रिया गावित यांचीही उपस्थिती होती. मासे खाण्याचे फायदे सांगताना तो म्हणाला की ऐश्वर्या राय रोज मासे खाते, त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हालाही सुंदर डोळे हवे असतील तर रोज मासे खा, असेही गावित म्हणाले.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मा. गावित साहेब… प्रेमात पडणं ही नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या…आणि हो…डोळे कसे दिसतात यापेक्षा त्या डोळ्यातलं पाणी बघणं, चिकण्या स्कीनऐवजी नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळं तारुण्यातच युवांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघणं आणि काबाडकष्ट करणाऱ्या त्यांच्या आईवडलांच्या हातावरच्या भेगा पाहणं, हे तुमचं काम आहे!कारण तुम्ही मंत्री आहात! अशी टीका पवार यांनी केली आहे.