‘तू इतके षटकार कसे मारतोस, तुझ्या बॅटमध्ये काही आहे का?’, अंपायरला रोहितचं लई भारी उत्तर

Rohit Sharma: भारतीय संघाने शनिवारी पाकिस्तानचा (India vs Pakistan) पराभव करून विश्वचषकात (World Cup 2023) या संघाविरुद्धची आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि सहा षटकारही आले. सामन्यादरम्यान एक वेळ अशी आली जेव्हा रोहित अंपायर मारियस एरमासला त्याचे डोले दाखवताना दिसला. यामागचे कारण काय हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले होते. सामना संपल्यानंतर संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने भारतीय कर्णधाराला याचे कारण विचारले.

बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केल्यानंतर डगआऊटमध्ये उभा असलेला हार्दिक (Hardik Pandya) त्याला विचारतो की तू अंपायरला तुझे मसल्स का दाखवत होतास. यावर रोहित हसत म्हणाला, ‘तो मला विचारत होता की तू इतके षटकार कसे मारतोस, तुझ्या बॅटमध्ये काही आहे का? मग मी त्याला सांगितले की शक्ती बॅटमध्ये नाही तर माझ्यामध्ये आहे आणि नंतर माझे डोले त्यांना दाखवले.” हे ऐकून हार्दिक आणि रोहित दोघेही हसायला लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा