रिषभ पंत नाही ‘हा’ भारतीय क्रिकेटर उर्वशी रौतेलाच्या प्रेमात? म्हणाला, “ती सर्वात सेक्सी अभिनेत्री”

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. उर्वशीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने नाव अनेकदा भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) जोडले जाते. अनेकवेळा ती स्टेडियममध्ये ऋषभ पंतला चीयर करताना दिसली आणि नंतर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. मात्र, या सगळ्यात एका भारतीय क्रिकेटपटूने उर्वशीला सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हटले आहे.

या क्रिकेटपटूने उर्वशीचे कौतुक केले
आपल्या निर्भीड आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्वशीचे जगभरात अनेक चाहते आहेत. आता तिच्या चाहत्यांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. हे नाव आणखी कोणाचे नसून भारतीय अष्टपैलू आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे आहे.

एका मुलाखतीत जेव्हा भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाला विचारण्यात आले की त्याला सर्वात सेक्सी अभिनेत्री (Sexy Actress) कोण वाटते?, तेव्हा त्याने उर्वशी रौतेलाचे नाव घेतले. तेव्हापासून क्रिकेटर जडेजा आणि अभिनेत्री उर्वशी दोघांचेही चाहते या मुलाखतीची चर्चा करत आहेत.