लज्जास्पद पराभवानंतर बाबरने विराटकडून जर्सी भेट घेतल्याने संतापला पाकिस्तानी क्रिकेटर, म्हणाला…

Babar Azam-Virat Kohli Jersey: विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यानंतर विराट कोहलीने (virat Kohli) कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली. कोहलीच्या या औदार्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. याबद्दल भारतीय चाहतेही कोहलीचे कौतुक करत आहेत. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमला (Wasim Akram) हे आवडले नाही. भारताचा सामना हरल्यानंतर बाबर आझमने मैदानाच्या मधोमध कोहलीची जर्सी का घेतली?, असा संताप अक्रमने व्यक्त केला. ते म्हणाले की, आजचा दिवस हे करण्याचा नव्हता.

वसीम अक्रम हा वर्ल्ड कपसाठी (World Cup) पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलमधील तज्ञांच्या पॅनेलचा एक भाग आहे. या घटनेबाबत एका चाहत्याने अक्रमला प्रश्न विचारला असता अक्रमही संतापलेला दिसला.

चाहत्याने विचारले, बाबर आझमला विराट कोहलीचे दोन टी-शर्ट मिळाल्याचे मी पाहिले. प्रत्येक टीव्ही चॅनल हा व्हिडिओ दाखवत आहे. मला एवढेच विचारायचे आहे की, जेव्हा तुम्ही अशा निराशाजनक पद्धतीने सामना हरलात आणि त्यामुळे पाकिस्तानचे चाहते दु:खी झाले आहेत, तेव्हा बाबरने तो खाजगी ठेवायला हवा होता आणि सर्वांसमोर टी-शर्ट घ्यायला नको होता.

वसीम अक्रमनेही चाहत्याच्या भावनांशी सहमती दर्शवली आणि तो म्हणाला, “आजचा दिवस असा नव्हता की एक मोठा सामना हरल्यानंतर तुम्हाला सर्वांसमोर असे टी-शर्ट गिफ्ट मिळेल. मी व्हिडिओ पाहिल्यावर तेच म्हणालो… जर तुला हे करायचं असतं आणि तुझ्या काकांच्या मुलाने तुला कोहलीचा टी-शर्ट आणायला सांगितलं असतं, तर तू मॅचनंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन ते करू शकला असतास. “हे सार्वजनिकरित्या केले जाऊ नये.”

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा