Rohit Sharma | मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची तीन शब्दांची पोस्ट, म्हणाला…

रोहित शर्मा (Rohit Sharma), इशान किशन यांच्यानंतर टीम डेव्हिड (नाबाद 45) आणि रोमारियो शेफर्ड (नाबाद 39) यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. आयपीएल 2024 मधील हा त्याचा पहिला विजय आहे. मुंबईने शेवटच्या 5 षटकांमध्ये शानदार फलंदाजी करत आयपीएलच्या 20 व्या सामन्यात 5 विकेट गमावत 234 धावा केल्या. दिल्लीने लक्ष्याचा जोमाने पाठलाग केला पण लक्ष्य खूप मोठे असल्याने दिल्लीला अखेर पाच सामन्यांत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीने 20 षटकांत आठ गडी गमावून 205 धावा केल्या.

चार सामन्यांतील पहिल्या विजयासह मुंबई आठव्या स्थानावर पोहोचली आहे, तर दिल्ली शेवटच्या आणि दहाव्या स्थानावर घसरली आहे. सामना जिंकल्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्माने तीन फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले- खाते उघडले (ऑफ द मार्क)! मात्र, सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुठेही दिसत नाही. पहिल्या फोटोत रोहित शर्मा रोमॅरियो शेफर्डसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे, तर दुसरा फोटो मुलांचा आहे. शेवटी, तो विरोधी संघाचा कर्णधार ऋषभ पंत आणि इशान किशनसोबत एक क्षण शेअर करताना दिसत आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये शानदार सुरुवात केली. रोहित (Rohit Sharma) आणि किशनचे अर्धशतक हुकले तरी त्यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. यानंतर उर्वरित फलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी केली. गोलंदाजी करताना त्याने पॉवरप्लेमध्ये खूप धावा दिल्या पण तिथून सामना दिल्लीसाठी खूपच कठीण झाला. दिल्लीकडून पृथ्वी आणि स्टब्सने चांगले प्रयत्न केले पण त्यांना आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यात यश आले नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !