Rohit Sharma: वानखेडेवर गरजली रोहित शर्माची बॅट, ‘हिटमॅन’ने दिल्लीविरुद्ध पूर्ण केल्या हजार धावा

Rohit Sharma: आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मुंबईसाठी दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने आपल्या शैलीत फलंदाजी केली. रोहितने पहिल्याच षटकातच आपले इरादे व्यक्त केले होते.

रोहित शर्माने इशांत शर्मापासून ते झाय रिचर्डसनपर्यंत सर्वांनाच धू धू धुतले. ललित यादव आणि अक्षर पटेल यांनाही त्याने सोडले नाही. मात्र, अक्षर पटेलनेच रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाद होण्यापूर्वी रोहितने 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र विराट कोहलीचा विक्रम मोडण्यापासून तो चुकला.

कोहलीपासून फक्त 5 धावा दूर
रोहित शर्माने दिल्लीविरुद्ध एक हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज ठरला. रोहित शर्माने झाय रिचर्डसनच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारून ही कामगिरी केली. मात्र, तो विराटला मागे टाकू शकला नाही. कोहलीने दिल्लीविरुद्ध 1030 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 1026 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सामन्यापूर्वी रोहितला ही कामगिरी करण्यासाठी 54 धावांची गरज होती.

आयपीएलमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध 1000+ धावा करणारे फलंदाज
डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पीबीकेएस आणि केकेआर
विराट कोहली विरुद्ध डीसी आणि सीएसके
रोहित शर्मा विरुद्ध केकेआर आणि डीसी

रोहित शर्मा वेगळ्याच रंगात दिसत आहे
उल्लेखनीय आहे की आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून सातत्याने धावा होत आहेत. कर्णधारपदाचा भार हटवल्याने तो आपल्या खास शैलीत फलंदाजी करताना दिसत आहे. रोहित पहिल्याच षटकापासून गोलंदाजांवर हल्ला करताना दिसत आहे. चार सामन्यात त्याने 118 धावा केल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Sanjay Kokate | शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

पोकळ घोषणा देणाऱ्या काँग्रेस आघाडीला पराभूत करा;आठवलेंचे पुदुचेरीत आवाहन

Mangaldas Bandal | मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, वंचित दुसरा उमेदवार देणार ?