‘हसण्याऐवजी रामदेव बाबांच्या कानशिलात मारायचं होतं’, अमृता फडणवीसवर भडकल्या रुपाली पाटील

ठाणे: ठाण्यातील एका योगा कार्यक्रमात महिलांबद्दल बोलताना योगगुरू रामदेव बाबा यांची जीभ घसरली. महिला अंगावर काहीही नाही घातलं, तरीही छान दिसतात, असं ते म्हणाले. यावेळी त्यांच्या बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस बसून होत्या.

एक स्त्री असूनही रामदेव बाबांच्या (Ramdev Baba) या वादग्रस्त विधानाचा विरोध न करता त्या हसत होत्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना चांगलेच सुनावले आहे. हसण्याऐवजी रामदेव बाबांच्या कानशिलात मारायला पाहिजे होते, अशा शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांची कानउघडणी केली आहे.

“अमृता फडवणीस वहिनी रामदेव बाबांच्या व्यक्तव्यावर हसून दाद देण्यापेक्षा सणसणीत कानाखाली मारली असती तर महिलांना उपमुख्यमंत्री साहेबांच्या पत्नी सक्षमपणे महिलांच्या सक्षमतेसाठी, सुरक्षेसाठी आहात याची खात्री झाली असती. महिलाच महिलेचा सन्मान वाढू शकते,” असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलं.

काय म्हणाले रामदेव बाबा?
ठाण्यातील योगा कार्यक्रमात रामदेव बाबा म्हणाले की, “साड्या नेसायला नाही मिळाल्या काही समस्या नाही… आता घरी जाऊन साड्या नेसा. महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा चांगल्या अमृता फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या वाटतात.. आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”,