सरकार हटवून इस्लामिक देश निर्माण करण्याचा उद्देश होता, यूपी एटीएसने संशयित दहशतवाद्याला अटक केली

लखनऊ : यूपी एटीएसला मोठे यश मिळाले आहे. यूपी एटीएसने भारतीय उपखंडातील अल कायदाचा संशयित दहशतवादी अझरुद्दीन याला अटक केली आहे. यूपी एटीएसने या संशयित दहशतवाद्याला सहारनपूर येथून अटक केली आहे. एटीएसने सांगितले की, हा व्यक्ती इस्लामिक राष्ट्र ( Islamic country) स्थापनेच्या मिशनसोबत काम करत होता. एवढेच नाही तर तो तरुणांना कट्टरपंथी बनवायचा. एटीएस आता या संशयित दहशतवाद्याच्या साथीदारांचा शोध घेत आहे.

यूपी एटीएसने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव अझरुद्दीन असे असून तो सहारनपूरचा रहिवासी आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, यूपी एटीएसने लुकमानला अटक केली होती, जो AQIS (भारतीय उपखंडातील अल कायदा) आणि जेएमबी मॉड्यूल दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. या प्रकरणी आरोपी मो. मुदस्सीर, अलीनूर, कामिल यांच्यासह 10 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान अझरुद्दीनबाबत एटीएसला माहिती मिळाली. तपासात एटीएसला अझरुद्दीनची भूमिका संशयास्पद वाटली, त्यानंतर त्याला सहारनपूरहून एटीएस मुख्यालय लखनऊ येथे आणून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर 30 डिसेंबर रोजी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. अझरुद्दीनच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.