यांची मुलं जातील अमेरिकेला, तुमची मुलं दहशतवादी बनतील, बहुजनांनो सांभाळून रहा!  

पुणे – सावरकर (Savarkar) नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत, आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं अभिनेते शरद पोक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी  म्हटलं आहे. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे (डीईएस) मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्यावतीने ‘मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर’ नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पोंक्षे  यांनी हे वक्तव्य केले आहे.

जेव्हा ८० टक्के हिंदुंना दुखवायचं असले, ८० टक्के हिंदुंचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर एकाच माणसावर चिखलफेक करा ८० टक्के हिंदू समाज (Hindu society) दुखावतो इतकी सावरकर नावाची दहशत आहे. ब्रिटिशांना होती, काँग्रेसला होती आजही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे. सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत. आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं मत  पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे.

यावरून आता  सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, दहशत बसली पाहिजे पण कोणाला? हिंदूंनाच बरं का! गांधींपासून दाभोळकरांपर्यंत हिंदूंनाच! या माणसाच्या दैवताची बॅरिस्टर जीनांना गोळी घालायची हिंमत नव्हती, तिकडे तसं केलं असतं तर नथ्थू जागेवरच खलास केला गेला असता. भारतात संविधान आणि कायदा यांचं संरक्षण काही काळ तरी नक्कीच मिळणार होतं. आणि हिंदू सहिष्णू होते. काॅग्रेस सहिष्णू आहे तितकी लीग सहिष्णू (Tolerant) नाही याची कल्पना स्वातंत्र्यानंतरचा पहिला अधिकृत दहशतवादी नथूरामाला आणि त्याला आशिर्वाद देणाऱ्या दहशतवाद्यालाही होती. हिंदू सहिष्णू आहेत म्हणून हे गांधींपासून दाभोलकर, पानसरेंपर्यंत हिंदू धर्मात सुधारणा करणाऱ्यांना बिनधास्त मारत आले. ‘अल-कायदा’ किंवा गेला बाजार ‘सीमी’शी लढण्याची यांची आहे का हिंमत या दहशतवाद्यांची? दहशतवादी म्हणल्यावर राग नको यायला आता उलट यांना अभिमान वाटला पाहीजे. यापुढे यांच्या दैवतांना आपण ‘दहशतवादी’ म्हणू शकतो बरं का! कारण दहशत हवीच.

यांची मुलं जातील अमेरिकेला, तुमची मुलं दहशतवादी (Terrorist) बनतील. बहुजनांनो सांभाळून रहा! पोंक्षे, तुमच्या मुलीला या देशात दहशतवादी होण्याचं उत्तम करीयर द्यायचं सोडून पायलट होण्यासाठी परदेशात का पाठवलं? असा सवाल देखील चौधरी यांनी उपस्थित केलाआहे.