आता तुम्ही कोणाची औलाद आहेत ते सांगावे ; अजितदादांवर टिका करताना सदाभाऊंची जीभ घसरली

नाशिक :- आमची सत्ता राज्यात आल्यानंतर आम्ही मोफत वीज (Free electricity) देऊ, आणि नाहीं दिली तरआम्ही पवारांची औलाद आहोत सांगणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिले होते त्यामुळे आता तुम्ही कोणाची औलाद आहे ? असा सवाल करत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. ते नाशिक येथे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या आंदोलनात बोलत होते.

खोत म्हणाले, कोरोना काळ संपला असला तरी राज्य सरकारचा कोरोना (Corona) मात्र संपला नाही आहे. राज्याच्या सरकारी तिजोरीवर दिवसाढवळ्या महाविकास आघाडी (MVA) दरोडा टाकत आहे. आमची सत्ता आल्यानतंर आम्ही वीज मोफत देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. नाही दिले तर आम्ही पवार यांची औलाद म्हणणार नाही असे बोलले होते. मग आता तुम्ही कुणाची औलाद आहे हे त्यांनी सांगावे असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल आहे.

यावेळी, त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) देखील निशाणा साधला. पीकविमा, नियमित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अजूनही मिळालेले नाहीत. आमची सत्ता आल्यावर प्रत्येक शेतकऱ्याचे १० हजार कर्ज भरणार असं शिवसेनेनं म्हटलं होत, पण १० हजार तर सोडाच, सरकारने शेतकऱ्यांची वीजच कापली आहे अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.