बोंबला : कोव्हिड पोर्टलऐवजी आरोग्य मंत्रालयाने शेअर केली Pornhub ची लिंक

क्युबेक – कॅनडामधील क्युबेक प्रांतातील आरोग्य मंत्रालयाने केलेली एक चूक सध्या चांगलाच चर्चेचा मुद्दा बनली आहे. कोव्हीड पोर्टलची लिंक ट्विटरवरुन पोस्ट करताना चुकून मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पॉर्न वेबसाईटची (Porn Website) लिंक पोस्ट करण्यात आली. पॉर्नहब वेबसाईटवरील एका पेजची लिंक आरोग्य मंत्रालयाकडून शेअर करण्यात आली होती.

पॉर्नहब ही जगभरामध्ये अश्लील कंटेटसाठी (Pornographic content) ओळखली जाते. ही वेबसाईट माइंडग्रीक कंपनीच्या (MindGreek Company) मालकीची आहे. दरम्यान, पॉर्नहब वेबसाईटवरील ( Pornhub website) एका पेजची लिंक मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र मंत्रालयाने तातडीने हे ट्विट डिलीट केलं. या प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे. या ट्विटर हॅण्डलला एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, या झालेल्या चुकीनंतर आरोग्य मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अनेकांनी मिम्स देखील बनवले असून सोशल मिडीयावर अनेकजण उपहासात्मक टीका करताना देखील दिसून येत आहेत.