… तर उठाव होणारच : छत्रपती संभाजीराजेंनी दिला कोश्यारी हटाओचा नारा

मुंबई –  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत राज्य व केंद्र सरकारला जाब विचारला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे अशी मागणी केली होती. तसे अधिकृत पत्रही त्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठविले होते. मात्र अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, याचा अर्थ राज्यकर्ते त्यांच्या विधानाशी सहमत आहेत का ? असा खडा सवाल विचारत संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नये, शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या या ट्विट नंतर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते काय पवित्रा घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे.