अतिक्रमण हटाव मोहीमेतील स्वच्छता निरीक्षकाला शिवीगाळ; कर्मचाऱ्यांनी सुरु केले काम बंद आंदोलन

तुळजापूर  –  तिर्थक्षेञ तुळजापूरात ( Tuljapur )चैञी पोर्णिमा याञा उत्सव पार्श्वभूमीवर शहरातील कुंभार गल्लीतील अतिक्रमण हटाव मोहिम सुरु आहे. या मोहिमेतील स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंखे ( Datta Salunkhe )व अतिक्रमण हटाव मोहीमेतील कर्मचारी यांना काहींनी दमदाटी करीत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली व स्वच्छता निरीक्षकच्या घरी जावुन त्याची पत्नी व मुलांना  शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सोमवार दि ४ पासुन सुरु केले आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यत कामबंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला .

तिर्थक्षेञ तुळजापूरात नगरपरिषद अतिक्रमण विभागाकडुन आगामी चैञी पोर्णिमा पार्श्वभूमीवर  भाविकांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जात आहेत.  घाठशिळ रोड वाहनतळातुन कुंभार गल्लीतुन भवानी रोड मंदीरा कडे येणाऱ्या रस्त्यावरून लाखोचा संखेने  रोज  भाविक ये जा करतात.  हा रस्ता अतिक्रमण मुळे अंत्यत अरुंद झाल्यानै येथे भाविकांचा चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते या रस्त्यावर दोन्ही बाजूस अतिक्रमण करण्याची व्यापारात चढाओड लागलेली असते.

प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी , उस्मानाबाद आदेशानुसार अतिक्रमण काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे . सदरचे अतिक्रमण मोहिम राबविण्यात असताना अनेक वेळा स्थानिक नागरिक , फेरीवाले , व्यापारी यांच्याकडून दमदाटी , शिवीगाळ व जिवे मारण्याची धमक्या देण्यात येत आहेत .

या बाबत आपणास लेखा निवेदनाद्वारे अवगत करण्यात आलेले आहे . तसेच पोलीस स्टेशन , तुळजापूर या ठिकाणी तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत . तरी सुध्दा अतिक्रमण मोहिमेवेळी सतत दमदाटी करणे , शिवीगाळ करणे व जिवे मारण्याची धमकी देणे या प्रकारामध्ये कोणताही फरक पडलेला नाही.

रविवारी . दि . 3   रोजी महाद्वार चौक, भवानी रोड , कुंभार गल्ली इ . फेरीवाल्याचे अतिक्रमण हटविण्याची मोहिम  आदेशानुसार राबवित असताना कुंभार गल्ली येथे गोरख भागवत पारधे शंकर सपकाळ व इतर 10-15 जणांच्या जमावाने दत्ता सांळुके  व अतिक्रमण मोहिमे मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी ,करुन शिवीगाळ केली  जिवे मारण्याची धमकी दिली व  संध्याकाळी स्वच्छता निरीक्षक दत्ता सांळुके यांच्या  राहत्या जावुन  पत्नी व मुलांना शिवीगाळ करून दमदाटी केली आहे . सदरचा प्रकार हे वारंवार घडत असल्यामुळे स्वच्छता निरीक्षक यांच्या  कुटूंबाच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे . तरी संबंधीतावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी याची दखल न घेतल्यास कामबंद आंदोलन चालुच राहिल असा इशारा यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला.