आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर करायला नार्वेकरांना आणखी एक संधी

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Shivsena & NCP Crisis) आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर करायला सर्वोच्च न्यायालयानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आणखी एक संधी दिली.

याप्रकरणी आता ३० ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. पुढच्या सुनावणीपूर्वी नार्वेकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करू असं आश्वासन सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिलं.विधानसभा अध्यक्ष प्रसारमाध्यमांना देत असलेल्या मुलाखतींवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली.

याऐवजी त्यांनी नेमून दिलेलं काम करावं,असं ते म्हणाले.विधानसभेच्या कामकाजात न्यायालयात अजिबात दखल देत नाही.मात्र आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी त्यांना लवाद म्हणून करायची असल्यानं त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंकुश असेल,असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा