ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत?; राऊतांचा सवाल 

मुंबई –  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आता जबर धक्का बसला आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या विरोधात कोणताही गुन्हाच दाखल केलेला नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात सांगितल्यानं नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला.

संजय राऊत यांचा हल्लाबोल

पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सगळ्यांना समजेल. ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? असा खासदार संजय सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टातून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा, असं संजय राऊत म्हणाले.