‘संदीपच्या बायकोनं पोलिसांना फ्रीज उघडून दाखवला ..अहो नाहीये घरात’

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya), त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली.

यावेळी केलेल्या भाषणातून महाविकास आघाडीची(MVA)  अक्षरशः पिसं काढली. आपल्या भाषणात त्यांनी पाणी प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या,औरंगजेबाची कबर. महाविकास आघाडीची धोरणं यावर कडाडून हल्ला चढवला. सोबतच मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या पोलिसांच्या कारवाईचा देखील समाचार घेतला. ते म्हणाले, २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा गेल्या. जो कायदा पाळा सांगतो, त्याला नोटिसा बजावणार. अटक करणार. जे कायदे पाळत नाहीत, त्यांच्यासोबत चर्चा करणार. क्या लगता है अस्लम भाई, आपको कितना लगता है. कितना साऊंड होना चाहिये. यात चर्चा काय करायची आहे?

संदीप देशपांडेला पोलीस शोधत होते. संदीपच्या बायकोनं फ्रीज उघडून दाखवला ..अहो नाहीये घरात. या सगळ्या आंदोलनात महत्त्वाची गोष्ट… मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांचे, पक्षाचे आभार आहेत. पण आपल्या विधी विभागाचे आभार मानीन की सगळ्या ठिकाणी वकील मंडळी उभी राहिली आणि आपल्या पोरांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं.

भोंग्यांचं आंदोलन एका दिवसाचं नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत आहेत. हे विसरले, की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.