राणे पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस

मुंबई – दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर, आता त्यांना मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नितेश राणेंना ३ मार्च रोजी, तर नारायण राणेंना ४ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आलेत.

नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस मालवणी पोलिसांनी बजावली आहे. तर नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे. दिशा सालीयान यांच्या आई वसंती सालियन यांच्या तक्रारीवरून मालवणी पेलिसांनी या दोन्ही नोटीस नारायण राणे आणि नितेश राणे यांना बजावल्या आहेत.

१९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान, आता दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.