सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

Sanju Samson on Rohit Sharma: भारतीय फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला फार कमी संधी मिळाल्या आहेत. संजूने 2015 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु गेल्या 8 वर्षांत त्याला भारतीय संघाकडून केवळ 37 सामने खेळण्याची संधी मिळाली. संजूने कसोटीच्या फॉरमॅटमध्ये पदार्पणही केलेले नाही. आता भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून पाठिंबा मिळाल्याचा मोठा खुलासा केला आहे.

मूळचा केरळचा असलेला संजू सॅमसन एकदिवसीय विश्वचषकासाठी दुर्लक्षित राहिला होता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याला संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसनचा समावेश होईल, अशी आशा चाहत्यांना होती, पण तसे झाले नाही. संजू सॅमसनला मात्र कर्णधार रोहित शर्माची साथ नेहमीच मिळाली आहे. हे खुद्द संजूनेच सांगितले आहे.

रोहित स्वतःच बोलला
29 वर्षीय संजू सॅमसन एका यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, ‘रोहित शर्मा हा पहिला किंवा कदाचित दुसरा व्यक्ती आहे जो माझ्याकडे येतो, नेहमी माझ्याशी बोलतो. तो एकदा मला म्हणाला- संजू. तू कसा आहेस. तू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलीस. मुंबई इंडियन्सविरुद्ध भरपूर षटकार मारले. जेव्हा तो (रोहित) माझ्याकडे आला तेव्हा मला खूप बरे वाटले. रोहित मला नेहमीच सपोर्ट करतो. त्याच्याकडून नेहमीच भरपूर पाठिंबा मिळतो.’

T20 मध्ये सरासरी कमी आहे
संजू सॅमसनने 2015 मध्ये T20 द्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 19.68 च्या सरासरीने एकूण 374 धावा केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने केवळ 13 सामने खेळले आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 390 धावा केल्या. या काळात त्याची सरासरी 55.71 होती.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी