राष्ट्रवादीकडे गृहखाते आहे आणि त्यामुळेच संभाजी भिडे यांचे नाव वगळले आहे का अशी शंका – आंबेडकर

मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार(Bhima Koregaon Violence) प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide of Shiv Pratishthan) यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याच पोलीसांनी न्यायालयात (In court) सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही (State Human Rights Commission) त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आलीय.

दुसऱ्या बाजूला या प्रकरणात ज्या इतर 41 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र (Indictment) दाखल करण्यात आले आहे.1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर( Prakash Ambedkar chief vanchit bahujan Aaghadi ) यांच्यासह आणखी काही पुरोगामी संघटनांनी (progressive organizations) केला होता. हे आरोप केल्यानंतर संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात तपास यंत्रणांकडून संभाजी भिडे यांना क्लीन चीट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी (NCP) आणि शरद पवारांवर(Sharad Pawar) गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीकडे गृहखाते आहे आणि त्यामुळेच संभाजी भिडे ( Bhima Koregaon case Sambhaji Bhide ) यांचे नाव वगळले आहे का अशी शंका आहे, असेही आंबेडकर म्हणाले. एका बाजूला याप्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीचे काही मंत्री या सगळ्या प्रकरणी संभाजी भिडे यांचे नाव वगळा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बगावत असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.