शुबमन गिलनं असं काय केलं जे पाहून सारा तेंडुलकर मारू लागली उड्या, Video व्हायरल

Sara Tendulkar Reaction on Shubman Gill Shot : भारताचा शानदार सलामीवीर शुभमन गिलने गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) वनडे विश्वचषक-2023 सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 53 धावांची खेळी खेळली. भारतीय संघाने हा सामना 7 विकेटने जिंकला. चालू विश्वचषकात भारताचा हा सलग चौथा विजय आहे. या सामन्यात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी (Sachin Tendulkar Daughter) सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) दिसली.

257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी 88 धावांची सलामीची भागीदारी केली. रोहितने 48 आणि शुभमन गिलने 53 धावांचे योगदान दिले. त्यानंतर विराट कोहलीने 103 धावांच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला. विराटने 97 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. भारताने 41.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.

सारा स्टँडमध्ये दिसली
भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्यादरम्यान महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर स्टँडमध्ये दिसली. तिच्यासोबत एक व्यक्ती बसली होती. शुभमन गिलचे शॉट्स पाहून साराही उत्साहित झाली. शुभमन गिलने 55 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. शुभमनने मोठमोठे शॉट्स मारल्यानंतर कॅमेराही साराकडे वळला. सारा कधी टाळ्या वाजवताना तर कधी हात हलवताना दिसली.

सारा याआधीही सामन्यादरम्यान दिसली होती
सारा तेंडुलकरला तिचे वडील सचिन आणि भाऊ अर्जुन तेंडुलकरप्रमाणेच क्रिकेट आवडते. सामना पाहण्यासाठी ती अनेकदा स्टेडियममध्ये पोहोचते. याआधीही ती स्टँडवर दिसली होती. आयपीएलदरम्यान सारा तेंडुलकर अनेक सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये बसलेली दिसली.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर