पाकिस्तानी हसीना सीमा हैदर आहे धोकेबाज? ‘हे’ 5 झोल करतायत तिची पोलखोल

चार मुलांची पाकिस्तानी आई सीमा हैदर (Seema Haidar) पब्जी गेम खेळणारा भारतीय तरुण सचिन माणीच्या प्रेमात पडली. ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या नैपाळमार्गे तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. सध्या भारतीय मीडियामध्ये सीमा हैदर हा चर्चेचा विषय बनला आहे.

सीमा हैदरची ही लव्ह स्टोरी काही जणांना खरी वाटतेय, तर काही जण त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. सीमा हैदरच्या पासपोर्टपासून तिच्या शिक्षणापर्यत अनेक प्रश्न विचारले जातायत. सीमा हैदरच्या ५ खोट्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमकथेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.

1- सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात दाखल झाली, त्यावर पाकिस्तानी यूट्यूबर शोएब मलिकने प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. सीमा पाकिस्तानी एजंट असू शकते, तिला कुठल्यातरी स्पेशल मिशनसाठी पाठवलेले असू शकतं, असं शोएब मलिकच म्हणणं आहे. काही लोकांनी यूट्यूबरचा मुद्दा खोडून काढला. पाकिस्तानात महिलांच्या स्थितीबद्दल त्याला उलटे प्रश्न विचारले.

2- सीमा हैदर म्हणते ती पाचवी पास आहे. पण तिची इंग्रजी भाषेवर उत्तम पकड आहे. पबजी खेळताना नोएडाच्या सचिन बरोबर बोलणं सुरु झालं, असं सीमाने सांगितलं. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, त्यानंतर ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. स्वत:चा वीजा सीमाने स्वत:च बनवलाय, या प्रक्रियेतून जाणं सीमासाठी अजिबात सोपं नव्हतं. त्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण होतायत.

3- सीमा हैदर भले पाचवी शिकली असेल, पण कॉम्प्युटर आणि मोबाइल चालवण्यात ती एक्सपर्ट आहे. पबजी खेळण्यात माहीर असलेल्या सीमाला मोबाइलवरुनच सचिनवर प्रेम जडलं. सचिन आणि सीमा दोघे दररोज दोन ते तीन तास पबजीवरुन चॅटिंग करायचे. भारतात आल्यानंतर ती दुसऱ्या हॉट स्पॉटवरुन सचिनशी बोलली.

4- सीमा हैदरच प्रतिज्ञापत्र समोर आलय. त्यातून सीमाचा खोटेपणा उघड झालाय. पाकिस्तानी गुलाम हैदरसोबत तिचं लग्न कुठल्याही दबावाशिवाय झालं होतं, हे त्यातून स्पष्ट होतं. गुलाम हैदरशी लग्न करण्याच्या 10 दिवस आधी तिने आपल्या वडिलांच घर सोडलं होतं. कारण कुटुंबीय तिच्या मर्जी विरोधात तिचं लग्न लावून देत होते.

5- सीमाचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात असल्याच तिने स्वत: सांगितलय. त्यामुळे सीमाच्या लव्ह स्टोरीबद्दल संशय निर्माण होतो. सीमाने मीडियाशी बोलताना सांगितलं की, तिने १२ लाख रुपयात आपली जमीन विकली. त्यानंतर दुबईहून नेपाळमार्गे ती भारतात दाखल झाली. सीमा जितक्या सहजतेने बोलतेय, पण हे तितकं सोपं नाहीय.