Seema Haider होणार सचिनच्या मुलाची आई! डिलीव्हरीची तारिख सांगताना म्हणाली, ‘लवकरच..’

Seema Haider Pregnancy:- 2024 च्या पहिल्या दिवशी सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आहे. नववर्षाच्या स्वागतासोबतच सीमा हैदरने एक मोठी खुशखबरही दिली आहे. सीमा हैदर या वर्षी सचिनच्या (Sachin) मुलाची आई होणार आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सीमा आणि सचिनने ही माहिती दिली. सीमा हैदर म्हणाली की, लवकरच चांगली बातमी मिळेल.

पाकिस्तानातून भारतात पळून गेलेल्या सीमाचे हे पाचवे अपत्य असेल. याआधी तिला पहिल्या पतीपासून चार मुले होती. ही मुलेही सीमासोबत भारतात आली आणि ग्रेटर नोएडा येथील सचिनच्या घरी राहात आहेत. लाइव्ह दरम्यान सीमा म्हणाली, “मी कधी आई होणार हे मला माहीत नाही, पण सचिन आणि मला नक्कीच मूल होणार हे निश्चित आहे.”

ऑनलाइन PUBG गेम खेळताना सचिन-सीमाची भेट झाली
पाकिस्तानची रहिवासी सीमा हैदर आणि यूपीचा रहिवासी सचिन मीना (Sachin Meena) यांची लव्हस्टोरी गेल्या वर्षी खूप चर्चेत होती. काही वर्षांपूर्वी ऑनलाइन PUBG गेम खेळताना दोघांची ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही नेपाळमध्ये पुन्हा भेटले. दोघांचे लग्न नेपाळमध्ये झाल्याचे सीमा आणि सचिन सांगतात.

पाकिस्तानातून पळून भारतात आले
यानंतर गेल्या वर्षी सीमा आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून पळून गेली आणि बेकायदेशीरपणे ग्रेटर नोएडा येथील सचिनच्या घरी आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हा मुद्दा दोन्ही देशांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच या प्रकरणात रस घेतला. जेव्हापासून सीमा हैदर सचिनच्या घरी राहत आहे, तेव्हापासून ती करवा चौथचे व्रत पाळणे आणि इतर हिंदू सण साजरे करण्यासाठी चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’