2023 मध्ये गुंतवणूकदार झाले मालामाल; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 82 लाख कोटी रुपयांची वाढ

Share Market: शेअर बाजाराने वर्ष 2023 ला मोठ्या नोटेवर निरोप दिला. वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले परंतु मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स हिरवे राहिले जे वर्षभर दिसून आले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 218 अंकांच्या घसरणीसह 72,186 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 47 अंकांच्या घसरणीसह 21,230 अंकांवर बंद झाला.

2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 30 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 60,840 अंकांवर बंद झाला, जो आज 72,240 अंकांवर बंद झाला. म्हणजेच एका वर्षात सेन्सेक्समध्ये १८.७३ टक्के वाढ झाली आहे. तर 2022 च्या शेवटच्या सत्रात निफ्टी 18,105 वर बंद झाला, जो 2023 च्या शेवटच्या सत्रात 21,731 वर बंद झाला. एका वर्षात निफ्टी 3625 अंकांनी किंवा 20 टक्क्यांनी वाढला आहे.

मार्केट कॅप विक्रमी उच्च पातळीवर

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांकावर बंद झाले. आजच्या सत्रात, सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 364.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 363 लाख कोटी रुपये होते. वर्ष 2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्राशी तुलना केल्यास, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2022 च्या शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 282.44 लाख कोटी रुपये होते.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत ३ जानेवारीला कार्यकर्ता शिबिर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

निधीतील घसरणीवर मात करण्यासाठी काँग्रेसने स्वीकारला क्राऊड फंडिंगचा मार्ग, जाणून घ्या कसा मिळतोय प्रतिसाद

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस परत आणायचे आहेत’