Kuldeep yadav: वनडे विश्वचषकापूर्वी कुलदीप पोहोचला बागेश्वर बाबांच्या दरबारात, घेतले आशीर्वाद

Kuldeep Yadav At Bageshwar Dham: भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) पुन्हा एकदा बागेश्वर धामच्या धिरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला. आशिया कपच्या काही दिवस आधी कुलदीपचे काही फोटो समोर आले होते ज्यात तो धीरेंद्र शास्त्री यांचे आशीर्वाद घेताना दिसत होता. आता 2023 च्या विश्वचषकापूर्वी (ODI World Cup 2023) त्याने पुन्हा एकदा येथे भेट दिली आहे. कुलदीपने आशिया कपमध्ये 9 विकेट घेत भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आशिया चषकापूर्वीही कुलदीपने बागेश्वर धामला भेट दिली होती. त्यानंतर जेव्हा तो परतला तेव्हा त्याने आशिया कपमधील 5 सामन्यात 9 विकेट घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याने एकूण 28.3 षटके टाकली आणि फक्त 103 धावा दिल्या. त्याचा इकोनॉमी रेटही उत्तम होता. अशा स्थितीत आता विश्वचषकापूर्वी कुलदीप येथे आला तर आगामी स्पर्धेत तो टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

आशिया चषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कुलदीप यादवला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याला 15000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 12 लाख 46 हजार रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने 8व्यांदा आशिया कप जिंकला. आता 2023 च्या विश्वचषकात सर्वांच्या नजरा कुलदीप यादववर असतील.

कुलदीप यादवचा दुसरा विश्वचषक
टीम इंडियाच्या संघात कुलदीप हा एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर आहे. त्यांच्याशिवाय रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल फिरकी विभागात आहेत. याचा अर्थ विश्वचषकात भारतीय खेळपट्ट्यांवर कुलदीपवर मोठी जबाबदारी असणार आहे. आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट आणि श्रीलंकेविरुद्ध 4 विकेट घेत सुपर 4 दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण विजयात कुलदीप यादवने मोठी भूमिका बजावली होती. हा त्याचा दुसरा एकदिवसीय विश्वचषक असेल, तो 2019 मध्येही संघाचा भाग होता.

महत्त्वाच्या बातम्या-