राखी मनोरुग्ण आणि लबाड, तिच्या त्रासाला कंटाळून दोघांनी आयुष्य संपवलं; तनुश्रीचे गंभीर आरोप

Tanushree Dutta On Rakhi Sawant: बॉलीवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यातील भांडण जगापासून लपलेले नाही. राखीने आदिलवर अनेक आरोप करत त्याला तुरुंगातही पाठवले होते. आता या प्रकरणात अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने उडी घेतली असून तिने राखीवर गंभीर आरोपही केले आहेत.

मला संपूर्ण देशाला सांगायचे आहे की राखी मनोरुग्ण आणि लबाड आहे. माझ्या चारित्र्याबद्दल ती खूप काही बोलली आहे. पण ते सर्व काही बनावट, खोटे आणि कृत्रिम होते. आज मला संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला किंवा तिचे नाव माहीत असलेल्या सगळ्यांना सांगायचे आहे की ती खूप खोटी आहे. ती दर पाच मिनिटांनी खोटे बोलते. तिची पातळी इतकी खालावली आहे की त्या पातळीवर जाऊन ती पुढे काय करेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही, असे तनुश्री दत्ता म्हणाली आहे.

राखी सावंत ही बॉलिवूडमधील एक साईड कॅरेक्टर आहे, जी विनाकारण इतरांच्या मुद्द्यांमध्ये अडकते आणि स्वतःच गोंधळ घालायला लागते. बॉलिवूडमध्ये असे अनेक गुंड आहेत जे सर्व चुकीच्या गोष्टी करतात. ते वाईट काम करतात, राखी सावंतसारख्या एक-दोन जणांना ते सांभाळतात. काही झाले तर ते राखीला कॉल करतात, पैसे ऑफर करतात आणि तिला सक्रिय करतात, असे तनुश्री दत्ता पुढे म्हणाली.