कोण होती शाहरुख खानची पहिली गर्लफ्रेंड? खुद्द ‘किंग खान’ने सांगितलंय नाव

अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) पुन्हा एकदा ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी थोडा वेळ काढला. आगामी पठाण चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्याने ‘आस्क एसआरके’ सत्राचे आयोजन केले. यावेळी त्याने चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे दिली, त्यापैकी बरेच प्रश्न त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाशी संबंधित होते. तसेच यादरम्यान त्याने त्याच्या पहिल्या प्रेयसीच्या नावाचाही खुलासा केला आहे.

शाहरुखने त्याच्या ट्वीटर अकाउंटवर लिहिले की, ’10 मिनिटे #AskSrk नंतर मुलांसोबत ‘पिठू’ (लगोरी) खेळायला बाहेर जायचं आहे.’ यानंतर लगेचच त्याच्या चाहत्यांनी त्याला एकामागोमाग एक प्रश्न विचारले. काहींनी त्याला पठाणबद्दल प्रश्न केले. तर यादरम्यान एका चाहत्याने त्याला त्याच्या पहिल्या प्रेयसीचे नाव विचारले.

‘तुझी पहिली प्रेयसी कोण होती?’, असा प्रश्न चाहत्याने (Shakrukh Khan First Girlfriend) केला. यावर ती दुसरी कोणी नसून त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) असल्याचा खुलासा शाहरुखने केला. या जोडप्याने 1991 मध्ये लग्न केले आणि ते आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम या तीन मुलांचे पालक आहेत.