सत्कार सोहळे नको… हार तुरे नको, निवेदने द्या… मला काम करू द्या – धनंजय मुंडे

पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात येताच स्वागत नाकारून धनंजय मुंडे यांनी साधला आष्टी ते बीड विविध गावातील नागरिकांशी संवाद

Dhananjay Munde – हार तुरे आणि सत्कार सोहळे नको… निवेदने द्या, मला काम करू द्या असे म्हणत, गावागावातील सत्कार टाळत फक्त निवेदने स्वीकारत कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agricultural Minister Dhananjay Munde) यांनी बीडकडे प्रवास केला. मात्र नेहमी हारतुरे, पुष्पगुच्छ आदींनी भरलेली धनंजय मुंडे यांच्या गाडीची डिक्की आज मात्र निवेदनाच्या थप्पीने भरलेली दिसत होती!

धनंजय मुंडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्यावर कृषीमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र बीड जिल्हावासीयांना खरी प्रतीक्षा होती ती धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदी नियुक्तीची!

दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांची बीडच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच ते अहमदनगर येथील ‘शब्दगंध’ या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बीडकडे निघाले असता, आष्टी तालुक्याच्या हद्दीपासून जागोजागी, गावोगावी लोकं रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभे होते.

धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून फुलांनी भरलेल्या जेसीबी बाजूला काढायला लावून, ‘तुमचे हार तुरे नको, आता मला काम करू द्या, कामाची निवेदने द्या’ असे म्हणत धनंजय मुंडे यांनी हारतुरे नाकारले.

बीड जिल्ह्याच्या हद्दीवर दौला वडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबाची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबादेवी फाटा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्कार नाकारून केवळ निवेदने स्वीकारली, यावेळी सोबत आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, आष्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल अप्पा सानप यांच्यासह अनेक पदाधिकारी सोबत होते.

https://youtu.be/fTZWF6rmkXs?si=5iYeROzfJ4iPq1vf

महत्वाच्या बातम्या-

Israel : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इस्रायलमधल्या युद्धात अडकली; तळघरात लपली आणि संपर्कही तुटला

Israel : पॅलेस्टीनच्या विरोधात इस्रायलने केली युद्धाची घोषणा; स्वोर्ड्स ऑफ आयर्न मोहिमेद्वारे शत्रूला घडवणार अद्दल

विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता; Jagdish Mulik यांच्या पाठपुराव्याला यश