शिवसेनेचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, नवनीत राणा यांनी व्यक्त केला विश्वास 

Amravati – खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठाकरे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनाच मिळेल, असा विश्वास राणा (Navneet Rana) यांना व्यक्त केला. फक्त हनुमान चालिसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला 13 दिवस या उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकलं. बाळासाहेबांचे विचारच जर त्यांच्या घरात ठेवले नाहीतर त्यांचं काय होईल? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाईव्हवर सरकार अडीच वर्षे चाललं, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.  नवनीत राणा म्हणाल्या, “सत्तासंघर्ष सध्या सुरु आहे. सत्ताचा काय संघर्ष आहे? जे बाळासाहेबांचे विचार घरात जिवंत ठेवू शकले नाहीत, ते सत्तेसाठी काय संघर्ष करणार? मला विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यांनाच धनुष्यबाण मिळेल असा विश्वास आहे. माझा देवावरचा विश्वास, हनुमान चालिसावर विश्वास आहे. बाळासाहेबांना मानणारे ज्यांच्याजवळ आहे, त्या एकनाथ शिंदेंना पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण मिळेल आणि त्या चिन्हावर ते आपले उमेदवार मैदानात उतरवतील, हा मला विश्वास आहे.”