26 महिन्यांपासून सत्ते बाहेर तरी देखील आम्हीच नंबर वन- चंद्रकांत पाटील

आम्ही गेल्या 26 महिन्यांपसून सत्तेपासून बाहेर आहोत तरी देखील आज झालेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या निकालावरून सत्ताधारी नव्हे तर आम्हीच राज्यात नंबर वन आहोत. हे सिद्ध झालं आहे.अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला फटकारले आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधतांना शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले आहे.

राज्यातील नगरपालिका- नगरपंचायत तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. पुन्हा एकदा भाजपा नंबर वन हे सिद्ध झाले आहे. गेले 26 महीने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरी देखील पक्षाचे संघटन मजबूत आहे.

ही सर्व भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांची एकजूट आहे. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईत गुंतले आहेत. जनता या प्रकरणाला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका नगर पंचायतीच्या निकालात दिसली आहे.